पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं सांगितलं होतं. व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांचं हित लक्षात घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेतल्याचं आरबीआय नं म्हटलं आहे. मात्र बँकिंग नियामक कायद्यानुसार पेटीएम पेमेंटस बँकेवर काही व्यावसायिक निर्बंध लादल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं.