‘अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची अनिवार्यपणे नोंदणी करावी’
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची भारतात अनिवार्यपणे नोंदणी केली जावी असं भारतीय कायदा आयोगानं एका अहवालात म्हटलं आहे. याबाबत २२व्या कायदा आयोगानं काल अनिवासी भारतीय आणि परदेशी नागरिकांशी संबंधित वैवाहिक समस्यांवरील कायदा’या शीर्षकाचा अहवाल सादर केला. केंद्रीय कायदा, अनिवासी भारतीय तसंच भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांच्या विवाहासंदर्भातील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरेसा व्यापक असावा तसंच अनिवासी भारतीयांबरोबरच भारतीय परदेशी नागरिक या व्याख्येत येणाऱ्या व्यक्तींनाही लागू केला जावा, असं त्यात म्हटलं आहे.