न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात मंजूर झालेलं विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधेयकावर विरोधकांना सभागृहात बोलू दिलं नाही आणि न्यायालयात न टिकणारं आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप त्यांनी मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.