नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरुदासपुर जवळडेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर तेडेरा बाबा नानक इथं सभा घेतील. या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात गुरूद्वारा कर्तारपुर साहिब इथं जाणाऱ्या भारतातील भाविकांची मोठी सोय होणार आहे.
२४ऑक्टोबरला डेरा बाबा नानक इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या जीरो पॉईंटवर कर्तारपुर साहीब कॉरीडॉरच्या परिचालन व्यवस्था उभारण्याबाबत भारत आणि पाकिस्तान दरम्यान करार झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंतीचा सोहळा देशभरात आणि परदेशातही उत्साहात करण्यासाठी डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कर्तारपुर साहिब कॉरीडॉरसाठी मंजुरी देण्यात आली होती. भाविकांना वर्षभर या कॉरीडॉरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूनं हा कॉरीडॉर उभारण्यात आला आहे.
उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्री सकाळी सुलतानपुर लोदी इथं बेर साहिब गुरुद्वाराचं दर्शन घेणार आहेत. याठिकाणी गुरूनानक देव यांनी १४ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला आणि दिव्य ज्ञान प्राप्त केलं. त्यांनी याच ठिकाणी मानवता आणि बंधुतेचा संदेश दिला होता.