नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार आहे.
या आधी ग्राहकांसाठी ४ वाजून ३० वाजेपर्यंतच बँकेत व्यवहार करता येत असल्यामुळे बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्या अनेक ग्राहकांची गैरसोय होत होती. आता नवीन नियमानुसार ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार असल्यामुळे ग्राहकांची व्यवहारासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.