Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशात परिस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या ५ जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा लाख हेक्टरहून अधिक जमीनीवरचं सुमारे ४०टक्के पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती विशेष मदत आणि पुनर्वसन आयुक्त पी. के. जेना यांनी दिली आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळसलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली, असंख्य वृक्ष उन्मळून पडले आहेत, अनेक ठिकाणी वीजेचे खांब उखडले गेले, तर अनेक टॉवर्सचंही नुकसान झाल्यानं दूरध्वनी सेवाही बाधित झाली आहे.

बुलबुल चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिमबंगालमध्ये, चक्रीवादळामुळे घटडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांत मरण पावलेल्यांची संख्या १० वर पोचली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात ५, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात २ तर, पूर्व मिदनापूर, पूर्व वर्धमान आणि कोलकत्ता जिल्ह्यातली प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, त्यामुळे सुमारे ४ लाख ६५ लाखांहून अधिक लोकांचं जनजीवन बाधित झालं असल्याची माहिती पश्चिम बंगालचे राज्य आपत्ती व्यवस्थापनमंत्री जावेद खान यांनी दिली आहे.

Exit mobile version