नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहोत, असं अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.