नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे बगदाद आणि बसरा इथं काल सुरक्षादलांनी निदर्शनाच्या ठिकाणी दारुगोळ्याच्या वापरानं केलेल्या कारवाईत सात निदर्शकांचा मृत्यू झाला.
बगदादच्या लिबरेशन चौकात काल सुरक्षा दलांनी जिंवत काडतुसा आणि अश्रुधूराचा वापर केल्यानं चार निदर्शक ठार झाले. तर बसरा इथं केलेल्या कारवाईत तीन निदर्शक ठार झाले.
सुरक्षादलांनी आतापर्यंत कारवायांमध्ये 200 हून अधिकजण ठार तर हजाराहून अधिकजण जखमी झाल्याची माहिती स्थानिक वैद्यकीय प्रशासनानं दिली आहे.