नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली. जयेश संघानी आणि केतन लकडावाला अशी अटक केलेल्या लेखापरीक्षकांची नावं असून हा घोटाळा झाला त्यावेळी या बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं.
याच प्रकरणात पीएमसी बँकेच्या परमीत सोधी आणि सुरजितसिंग नारंग या दोन संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईतल्या सत्र न्यायालयानं फेटाळले. या दोघांची कोठडीत चौकशी होण्याची गरज लक्षात घेऊन न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला. पीएमसी बँकेच्या सुमारे ४०० खातेदारांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या समस्यांची माहिती दिली.