Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्र्पतींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : उपराष्ट्र्पती एम. वेंकय्या नायडू यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, ” भारतीय संसदीय व्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणा  करणारे शेषन यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे.

1990-96 दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी आदर्श आचारसंहिता हे सशक्त साधन बनवले. त्यांनी निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणली तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रचारावरील खर्चावर मर्यादा घातली.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सकारात्मक बदल केले आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी दिल्या. जगभरातील लोकशाहींसाठी भारतीय निवडणूक आयोग आदर्श बनला. कठोर धोरणे आणि प्रक्रिया राबवत त्यांनी निवडणुकीतील अपप्रवृत्तींना आळा घातला.

त्यांनी खूप मोठा ठेवा मागे ठेवला असून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायला हवे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ”

Exit mobile version