Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रासिलियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्या आधी सर्व नेते बंद दाराआड चर्चा करणार असून त्यानंतर समितीस्तरावर चर्चा करतील. त्यानंतर सर्व नेते ब्रिक्स व्यापार परिषदेशी आणि विकास बँकेशी चर्चा करणार आहेत.

यावेळी विकास बँक आणि परिषद हे नेत्यांना आपले अहवाल सादर करतील. समिती स्तरावरील बैठकीमधील सर्व नेत्यांच्या परस्पर सहकार्याचं आणि त्यांच्या धोरणांचं प्रतिबिंब पडेल असा अदांज व्यक्त होत आहे. या दरम्यान ब्रिक्स भविष्यकालीन संपर्क यंत्रणा आणि संस्थेची स्थापनाही होणार आहे. ब्रिक्स देशांच्या संबंधांमध्ये ही संस्था मैलाचा दगड ठरणार आहे.

Exit mobile version