नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं ‘राहत’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि दरडी कोसळून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला, तर अडकलेल्या प्रवाशांना सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गालगत २० ‘राहत’केंद्र उभारण्यात येतील. राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवारा व्यवस्थेचीही विभागीय आयुक्तांनी पाहणी केली.