नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, याकरता लोकसभा सभापतींनी ही बैठक बोलावली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनीही येत्या रविवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारच्या वतीनंही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.