नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानात बोलत होते. जागतिक मंचावर भारतानं खंबीरपणे उभं राहणं अपेक्षित असताना भारताच्या परराष्ट्र धोरण जुनाट विचारांशी बांधून ठेवणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
जागतिक स्तरावर मोठे आर्थिक बदल होत असून त्याचा परिणाम ब्रेक्झीट, अमेरिकन चीन व्यापार अशा घटनांमधून दिसून येतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करारावर सही न करण्याच्या भारताच्या नि र्णयाचं त्यांनी समर्थन केलं. चुकीचा करार करण्यापेक्षा कोणताही करार न होणं हिताचं ठरतं असं ते म्हणाले.
दहशवाद्याच्या मुद्यावर पाकिस्तानशी दोन हात करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ठोस निर्णयाची जयशंकर यांनी स्तृती केली. पाकिस्तानबरोबरच्या शिमला करारामुळे जम्मू-कश्मीरमधे पाकिस्तानचा हस्तक्षेप अधिक वाढला, असं ते म्हणाले.