Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसक घटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे. अनुराधापुरम इथं मतदारांना घेऊन जाणा-या बसगाड्यांना काही अज्ञात लोकांनी अडवून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

काही मतदान केंद्रावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्याची जबरदस्ती मतदारांवर करण्याच्या घटना घडल्या. श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी जनतेला शांततापूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.  राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ३५ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत माजी सुरक्षा सचिव गोटाबाया राजपक्षे आणि मंत्री सुजित प्रेमदासा यांच्यात आहे. गोटाबाया यांना सिंहली समुदायाचा तर सुजित यांना अल्पसंख्याक तमिळ आणि मुस्लीमांचा पाठींबा आहे.

Exit mobile version