Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दुबई इथल्या जागतिक पॅराअँँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आत्तापर्यंत ९ पदकांसह भारतानं नोंदवली आपली सर्वोत्तम कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबई इथं जागतिक पॅराअँँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं ९ पदकं पटकावून आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळवत भारत टोकियो २०२० मधे होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत १३ जागांसाठी पात्र ठरला आहे.

यापूर्वी २०१७ मधे भारतानं ५ पदकं मिळवत ३४वं स्थान पटकावलं होतं. यंदाच्या ह्या स्पर्धेमधे २५सुवर्ण पदकांसह ५९ पदकं मिळवणारा चीन प्रथम स्थानी असून ३९ पदकं मिळवत ब्राझील आणि २८ पदकांसह ब्रिटन तिसऱ्या स्थानी आहेत.

Exit mobile version