Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्‍वाभिमान योजना बैठक संपन्‍न

बारामती : राज्‍य शासनाच्‍या सामाजिक न्‍याय विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्‍वाभिमान योजनेबाबतची  आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.

या बैठकीसाठी तहसिलदार विजय पाटील, उप अधिक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, तालुका कृषी अधिकारी दत्‍तात्रय पडवळ, नायब तहसिलदार महादेव भोसले, समाज कल्‍याण विभागाचे अधिकारी  तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी कांबळे यांनी सदर योजनेबाबत प्राप्‍त अर्ज व त्‍यावर केलेली कार्यवाही याबाबत माहिती घेतली. तसेच प्राप्‍त अर्जातील त्रुटी संबंधित अर्जदाराच्‍या निर्दशनास आणून सुधारित अर्ज पुन्‍हा सादर करून घ्‍यावेत, अशा सूचना केल्‍या.सं‍बंधित अधिकाऱ्यांनी यापुढील कालावधीत करावयाच्‍या कामकाजाबाबत सूचना करून त्‍यांनी उपस्थित अधिका-यांच्‍या अडचणी जाणून घेवून त्‍यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version