Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेना खासदारांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या प्रागंणात आंदोलन केलं. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतर या आंदोलनाच्या वेळेस उपस्थित होते.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करावी या मागणीसाठी विरोधी खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली. लोकसभेचं कामकाज सुरु होताच बिहारमधल्या समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज, मध्य प्रदेशमधल्या शाहडोलचे खासदार हिमाद्रीसिंग साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि तामिळनाडूतल्या वेल्लोरचे खासदार डी. एम. काथिर आनंद यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. या अधिवेशनात एकूण २० बैठका होणार असून ते १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Exit mobile version