नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षण कौशल्यात सुधारणा करण्यासाठी रिझर्व बँक पर्यवेक्षक महाविद्यालय उभारत आहे, अशी माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
ते एका कार्यक्रमात बोलत होते. पर्यवेक्षकांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी रिझर्ब बँक सातत्यानं प्रयत्न करत असते, असं त्यांनी सांगितलं.