Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.

दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. ज्या परदेशी नागरिकांना त्यांचा प्राथमिक व्हिसा वैद्यकीय व्हिसामधे बदलून द्यायचा असेल त्यांच्यासाठी या सवलती आहेत.

आजारपणासाठी रुग्णालयामधे राहून १८० दिवसांच्या उपचारासाठी या सवलती लागू आहेत. मात्र, ज्या आजारांमधे अवयव प्रत्यारोपण आवश्यक आहे. त्यावेळी फक्त वैद्यकीय व्हिसा असल्यासच परवानगी मिळेल.

Exit mobile version