Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019 या वर्षीच्या या पुरस्कारांसाठी सूक्ष्म व लघु उत्पादक घटकांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक  15 ‍डिसेंबर 2019 आहे.

मुंबई प्राधिकरण विभागातील मुंबई उपनगरामध्ये उत्पादन करणाऱ्या पात्र उद्योग घटकांना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचे हस्ते सन 2019 या वर्षासाठी पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून पुरस्कारासाठी पात्र घटकांचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

1) अर्जदार उद्योग घटकाने सूक्ष्म अथवा लघु उद्योग उत्पादक घटक उद्योग आधार मेमोरॅण्डम प्राप्त केलेले असावे व घटकाचे उत्पादन तीन वर्षापासून अथवा त्यापूर्वी सुरु झालेले असावे.

2) आवेदन पत्रामध्ये नमूद असलेल्या उत्पादित बाबींसाठी घटक मागील तीन वर्षे सलग उत्पादनामध्ये असावा.

3) यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कारप्राप्त झालेले घटक या पुरस्कारांसाठी पात्र ठरणार नाहीत.

4) उद्योग घटक बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जाचा नमुना व इतर माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा –

            उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

            विकास सेंटर, 702, 7 वा मजला, सी गिडवाणी मार्ग,

            बसंत सिनेमागृहाजवळ, चेंबूर (पूर्व), मुंबई-400 074.

            दूरध्वनी क्र.25208182/25206199

            Email ID : didicmumbai@gmail.com

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2019 आहे.

Exit mobile version