Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर

पुणे : जाहिरात संदेश प्रसारण धोरणातील जाचक अटी रद्द करून लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देण्यात आले आहे. लघु व मध्यम वृत्तपत्रांनासाठी असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया करीत असलेल्या कामाचे कौतुक करून आपल्या निवेदनातील भावना शासनापर्यंत पोहोचवल्या जातील अशी हमी ही उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी दिली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते ,माजी अधिकारी एस आर माने, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण पाटील (कोल्हापूर), नॅशनल कौन्सिल मेंबर गोरख तावरे (कराड), महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सौ. तेजस्विनी सूर्यवंशी (सांगली), कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह पवार (कोल्हापूर), रंगराव शिंपुकडे (सांगली), ए. आय. मुजावर (सांगली) जिल्हा सचिव सम्राट सनगर (कागल), उदय चव्हाण (कोल्हापूर), योगेश अग्रवाल (कोल्हापूर), अरुण वडेकर (इचलकरंजी) यांची यावेळी उपस्थिती होती. कोल्हापूरचे विभागीय माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. यावेळी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र शासनाच्या २००१ साली जाहीर केलेल्या जाहीरात वितरण धोरणाची आणि त्यात वारंवार केलेल्या सुधारणा आदेशाची अंमलबजावणी केलेली नसतानाच शासनाने पुन्हा एक जाहीरात वितरण धोरण (संदेश प्रसार धोरण २०१८) जाहीर केले. त्यात अनेक जाचक आणि अन्यायकारक अटी छोट्या वृत्तपत्रांवर लादल्या आहेत. त्यासाठी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे असंख्य वेळा निवेदने दिली, त्यात सामुहिक आणि व्यक्तिगत निवेदनांचाही समावेश आहे. दरम्यान 16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, यांना निवेदन देऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिली.

 

Exit mobile version