Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यासाठी विरोध असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करायला आपला विरोधच असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केला आहे. यासंदर्भात ब्रिटनने मांडलेल्या कराराच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली.

या करारानुसार शस्त्रांचा विकास, उत्पादन आणि साठा करण्यावर बंदी घालायला मंजुरी दिली आहे.  सुरक्षा परिषदेनं सर्व देशांना या कराराची अंमलबजावणी करण्याचा आग्रह केला आहे. १९९३ चा शस्त्रबंदीचा हा करार १९९७ रोजी लागू झाला होता.

उत्तर कोरिया, मिस्त्र, दक्षिण सुदान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या. इस्त्रायलनं स्वाक्षरी केली असली तरी मंजुरी दिलेली नाही.

Exit mobile version