नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात रुग्णांना लाभ व्हावा यासाठी दुसऱ्या टप्प्यात २० जनौषधी आणि अमृत स्टोअर उघडण्यात येणार आहेत.
जम्मू काश्मीरचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त अटल डुल्लू यांनी जम्मू इथं झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
या बैठकीत त्यांनी या केंद्रशासित प्रदेशातल्या जनौषधी आणि अमृत स्टोअरचा आढावा घेतला.