Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सांस्कृतिक तसंच भाषिक विविधता असलेल्या आपल्या देशानं जगाला नेहमीच एकतेची शिकवण दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशाच्या संस्कृती, भाषा आणि परंपरा यांच्यात विविधता असली तरी जगाला आपण विविधेतून एकतेची शिकवण देत आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटलं आहे. कित्येक हजारो वर्षापासून आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांचा जन्म झाला आणि त्या समृद्धही झाल्या.

उत्तराखंडमधल्या भाषा संर्वधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उच्चारही त्यांनी केला. मातृभाषेला महत्त्व देणा-या आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेन्दु हरिशचंद्र आणि महाकवी सुब्रमण्यम भारती यांचे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. आज साजरा होणा-या राष्ट्रीय कैडिट कोर- एनसीसी दिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही एनसीसी कॅडेटस् शी संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सादर केले.

एनसीसी सारख्या उपक्रमामुळे व्यक्तीत नेतृत्व देशभक्ती, निस्वार्थीवृत्ती, शिस्त आणि कठोर परिश्रम अशा गुणांचा विकास होतो. आपले वीर सैनिक, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं बलिदान यांचं स्मरण करण्यासाठी आपण 7 डिसेंबरला सशस्त्र ध्वजदिन साजरा करतो यात प्रत्येक नागरिकनं सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं फिट इंडिया मोहिम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मंडळाचं प्रधानमंत्र्यांनी कौतूक केलं. त्याचबरोबर इतर शिक्षण मंडळांनी ही मोहिम राबवावी, ज्यामुळे सर्वाना आरोग्याचे महत्त्व पटेल. प्रधानमंत्र्यांनी आपल्या घटनेला 70 वर्ष पूर्ण होत असून, 26 नोव्हेंबरला साजरा होणा-या घटनादिवसाचं महत्त्व अधोरेखित केलं.

नुकत्याच झालेल्या अय्योध्याभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं धैर्यानं संयम राखत सर्वांनी मनापासून स्वागत केलं याबद्दल जनतेचे आभार मानले. आपल्या पुर्वज्यांनी निसर्ग, निसर्गातील घटक यांना महत्त्व दिलं होतं. याचं महत्व समजून आपणही आपल्या पर्यावरणासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version