नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे. या महिन्यात 30 तारखेला पहिलया टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात सहा जिल्ह्यातल्या 13 जागांसाठी मतदान होईल.
या जागांसाठी 189 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि झारखंड विकास मोर्चासह विविध पक्षांच्या प्रचारसभा आणि रोडशो होणार आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत.