Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचा नेतृत्व करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सरकारच आपण दोन वर्ष नेतृत्व करु आणि बेंजामीन नेतन्याहू यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्तता झाली तर पुढची दोन वर्ष ते नेतृत्व करतील असं गँटझ् यांनी म्हटलं आहे.

मुदतपूर्व निवडणुका कोणालाही नको आहेत आणि त्या टाळण्याचा हाच एकमेव उपाय आहे, असं त्यांनी सांगितलं. नेतन्याहू यांच्यावर खटला चालवला जाईल अशी घोषणा इस्राइलच्या अँँयटर्नी जनरलनं केल्यामुळे इस्राइलमधे राजकीय पेच निर्माण झाला आहे. सलग दोन निवडणुकांमधे स्पष्ट जनादेश मिळाला नसल्यानं नेतन्याहू संध्या काळजीवाहू सरकार चालवत आहेत.

Exit mobile version