Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या पोलीस मित्रांचा सन्मान

पिंपरी : १६ मे २०१९ रोजी आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर यांचे दालनामध्ये संपन्न झाला.

अनुप मोरे सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन व महापौर पिंपरी चिंचवड महापालिका यांचे संयुक्त विद्यमाने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी,आर एस कुमार,माहिती आणि जनसंपर्क सहा.आयुक्त आण्णा बोदडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संत साहित्याचे अभ्यासक श्रीमती मंगला घाळी, देवयानी पाटील, अर्चना दाभोळकर, समिती अध्यक्ष विजयकुमार पाटील, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमित डांगे, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, समीर चिले, तेजस सापरिया, नितीन मांडवे, मौसमी घाळी या दक्ष समिती पोलीस मित्र स्वयंसेवकांचा महापौरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
Exit mobile version