Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्णपदकांची केली कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी इथं सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पुरुष विभागात ४८ किलो वजनी गटात आकाशनं तर ग्रेको रोमन विभागात ६८ किलो आणि ७५ किलो वजनी गटात अंकित गुलीयानं सुवर्ण पदक मिळवलं.

महिला विभागात भारताच्या सलोनीनं ३३किलो, बबलीनं ३६ किलो आणि कोमलनं ३९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत आता भारताची ८ सुवर्ण पदकं झाली.

Exit mobile version