नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक जल उत्सवाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी उपाययोजना आखण्याची विनंती त्यांनी केली, नवी दिल्लीत पार पडलेल्या राज्यपालांच्या ५० व्या परिषदेत बोलत होते.
या परिषदेत जलजीवन अभियानाबाबत झालेली चर्चा सरकार जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन तंत्राला देत असलेलं प्राधान्य दर्शवते असं ते म्हणाले. आदिवासी भागांच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि क्रीडा आणि युवक विकास क्षेत्रातील पुरोगामी योजनांचा स्विकार करण्याचं आवाहन केलं, त्याचबरोबर ११२ महत्त्वकांक्षी जिल्ह्यांच्या विशेषतः आदिवासी भागातल्या जिल्ह्यांच्या विकास गरजा पूर्ण करण्यासाठी अभियानावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी केलं.