Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी मंदिरासाठी लाकडी पोर्टा केबिन तयार करण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता.

गुरु रविदासांच्या अनुयायांना भविष्यात कुठलीही अडचण येऊ नये, आणि सर्व यंत्रणा मंदिराच्या उभारणीत सहकार्य करतील, यादृष्टीनं न्यायाधीश अरुण मिश्रा आणि सुर्यकांत यांच्या खंडपीठानं हा निर्णय बदलला.

Exit mobile version