पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे,भारत वाघमारे, निता शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, खेडचे उप विभागीय अधिकारी संजय तेली, तहसिलदार अर्चना निकम, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.