Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीत चर्चा सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विशेष अधिवेशनाद्वारे झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी २८२ सदस्यांना शपथ दिली. सहा सदस्य अनुपस्थित होते. त्यातल्या चार सदस्यांना अध्यक्षांच्या दालनात शपथ देण्यात आली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच ठाकरे कुटुंबातले पहिलेच निर्वाचित प्रतिनिधी आदित्य ठाकरे यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीचे अजित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, धनंजय मुंडे यांनी आज शपथ घेतली. सर्व उपस्थित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन समाप्त झालं.

Exit mobile version