Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं उपस्थित राहवं अशी अमेरिकी काँग्रेस समितीची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीनं, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांना स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित रहायला सांगितलं आहे.

सभेच्या न्याय समितीनं कालच ट्रम्प यांच्या विरोधातल्या महाभियोगाची सुनावणी चार डिसेंबरला करण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी एकतर या सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावं किंवा यावर टीका करणं थांबवावं असं न्यायसमितीचे डेमोक्रेट अध्यक्ष जेरोल्ड नेडलर यांनी म्हटलं आहे. युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमीर जेलेन्सकी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात जुलै महिन्यात झालेली बातचित या महाभियोगाच्या दुस-या टप्प्यामधे केंद्रस्थानी आहे.

Exit mobile version