नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानातल्या उत्तर कुंडूज प्रांतात काल तालीबान्यांनी पेरलेल्या भुसुरुंगावरुन वाहन गेल्यानं झालेल्या स्फोटात ८ मुलांसह १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचं अफगाणी गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहिमी यांनी सांगितलं.
या भागात तालीबानी दहशतवादी आणि अमेरिकन पाठिंबा असलेल्या अफगाणी सैन्यात नेहमीच चकमकी होत असतात. तालीबानी बंडखोरांनी २०१५ मध्येही या भागावर हल्ला केला होता.