मुंबई (वृत्तसंस्था) : आय.सी.आय.सी आय. बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची तडाखे बंद खरेदी झाल्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आज 41 हजार 164 च्या नव्या उच्चांकावर पोहोचला.
दिवसअखेर निर्देशांक 41 हजार 130 वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज 10 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीच्या समभाग मूल्यात आज 65 शतांश टक्के वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीने 77 शतांश टक्के वाढ नोंदवली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आज 50 अंकांनी वधारुन 12 हजार 151 अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला.चलनबाजारात आज रुपयाच्या मूल्यात 27 पैसे घसरण झाली. बाजार बंद होताना डॉलरचं विनिमय मूल्य 71 रुपये 62 पैसे होतं.