नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली इथं काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत होत्या.
बेरोजगारी वाढत असून गुंतवणूकही येत नाही, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधलं राज्यपालांचं वर्तन अशोभनीय होतं, असं त्या म्हणाल्या.
भाजपाची निवडणूकपूर्व युती त्यांच्या अंहकार आणि अतिआत्मविश्वासामुळे टिकू शकली नाही, अशी टीका त्यांनी केली.