नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली आहे, असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय परदेश दौ-यातून परराष्ट्र धोरणाला प्रोत्साहन देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत ते बोलत होते.
आपल्या सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात रालोआ सरकारनं शेजारी प्रथम या धोरणावर भर दिला आहे, आणि त्यानुसार प्रमुख देशांबरोबर भारताचे संबंध दृढ करण्यावर भर दिला जात आहे, असं ते म्हणाले.
दक्षिण पूर्व आशिया, आखाती देश आणि आफ्रिकी भागातल्या देशांबरोबर संबंध दृढ करण्यासाठी भारतानं विशेष प्रयत्न केले आहेत, असं जयशंकर म्हणाले.