Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर सौरभचा सामना थायलंडच्या कुणलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल.

युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ गेममधे हरवून उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठ्ली आहे.

Exit mobile version