पुणे : नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारावर, तसेच गुन्हेगार वृत्तीला कसा आळा घालायचा याचे मॉडेल निर्माण करणा-या पुणे पोलीस विभागाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या पोलीस विभागाचे नाव उंचावले असल्याचे प्रतिपादन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी आज येथे केले.
पुणे शहर वाहतूक शाखा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांच्या हस्ते झाले, यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम,अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
सुबोध कुमार जायसवाल म्हणाले, पोलीस विभागात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून पुणे पोलीस विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. पोलीस विभागाला नागरिकांचा प्रतिसाद महत्वापकचा असून पुण्यात हा प्रतिसाद मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त करून ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे, त्याप्रमाणेच प्रत्येकाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे पोलीस विभागासाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधेसाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असून पुणे शहर वाहतूक शाखा कार्यालयाच्या नूतन इमारतीचा नागरिकांना नक्कीच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम म्हणाले, पुणे पोलीस विभागाचा तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर आहे. लहान बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भर दिला असून वाढते अपघात रोखण्यासाठी महत्वा कचे पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, सेवानिवृत्ती अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.