Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना  सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

११ ऑक्टोबर २०१४ ला देशाच्या विविध भागात टप्याटप्प्याने सांसद आदर्श ग्राम पंचायत योजना सुरु करण्यात आली होती. खासदारांची नेतृत्व क्षमता आणि प्रतिबद्धतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं ही योजना सुरु करण्यात आली. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३११ तर तामिळनाडूत १९० सांसद आदर्श ग्राम पंचायती आहेत

Exit mobile version