Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीसाठी कुटुंब आनंदी असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृ परिषदेच्या सांगता समारोहाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई भेटीवर आलेल्या महिला प्रतिनिधींनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांसह बल्गारीया, जॉर्जिया, जर्मनी, इराण, कझाकस्थान, नेपाल व उझबेकीस्तान यांसह भारतातील महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.

Exit mobile version