नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कार्ल आणि राणी सिल्व्हिया आज सहा दिवसांच्या भारताच्या भेटीवर येत आहेत. या भेटीत ते नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन परस्पर हिताच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करतील.
या भेटींदरम्यान अनेक द्विपक्षीय सहकार्य करार होण्याचीही शक्यता आहे. राजे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया दिल्लीतल्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाशिवाय, मुंबई आणि उत्तराखंडला देखील भेट देणार आहेत. भारत आणि स्विडनमध्ये सव्वातीन अब्ज डॉलर्सहून अधिक व्यापारी उलाढाल होते, तर दोन्ही देशांमधली गुंतवणूक सुमारे अडीच अब्ज डॉलर्स इतकी आहे.