Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून सेवा केंद्रांमधल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही- अमरिंदर सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन अर्ज करून पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या कोणत्याही भाविकाकडून, सरकारनं तिथं स्थापन केलेल्या सेवा केंद्रांमधल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही असं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

ते काल चंदीगढ इथं वार्ताहरांशी बोलत होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भाविकांकडून सुविधा शुल्काची मागणी केली जात असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं. अशा प्रकारची मागणी होत असेल तर भाविकांनी आपल्या कार्यालयाला त्याची माहिती द्यावी असं आवाहनही अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.

Exit mobile version