Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची फिफाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होत असलेल्या १७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी फिफा, या फुटबॉलच्या जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काल केली.

फिफाचे स्पर्धाप्रमुख ऑलिव्हर वोग्ट यांनी स्टेडियममधल्या सोय-सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं. पुढच्या वर्षी २ ते २१ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या जागतिक स्पर्धेतल्या काही सामन्यांसाठी नवी मुंबईचं डी वाय पाटील स्टेडियम प्रस्तावित आहे. यासंदर्भातली पुढची पाहणी २०२० मधे होणार आहे.

Exit mobile version