मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्याला काहीही निधी मिळाला नव्हता आणि या प्रकल्पात राज्याची भूमिका केवळ भूसंपादनापुरतीच मर्यादित होती, असं फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेनाप्रणीत आघाडीकडून 40 कोटी हजार रुपयांच्या केंद्रीय अर्थसाहाय्याचा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अल्पकालीन सरकार स्थापन करण्यात आलं, असा दावा हेगडे यांनी शनिवारी केला होता.
हेगडे यांचा दावा खरा असेल, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बिगर भाजपा राज्यांसाठी हे अन्यायकारक आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.