Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असंही ते म्हणाले. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे.

मात्र कामाची  प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

Exit mobile version