नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय तसंच प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा तसंच विद्यार्थी परीक्षा काळात भयमुक्त रहावं यासाठी पुढच्या वर्षी ‘परीक्षा पे चर्चा-2020’ ही स्पर्धा प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
नववी ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, ‘mygov.in’ या संकेतस्थळावर स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती घेता येईल.