Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जात आहेत. केंद्र शासनाच्याा निर्देशानुसार मे २०१८ पासून मुंबईत ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईत मातृवंदन सप्ताह होणार आहे.

सानपाडा इथल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांनी मातृवंदन योजनेचा लाभ घेणा-या तीन मातांचं अभिनंदन केलं. या योजनेअंतर्गत आठ हजार सातशे एकोणसत्तर लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. वाशिम जिल्हयातही मातृ वंदन योजना सप्ताह साजरा होत आहे.

ही योजना सध्या ग्रामिण क्षेत्राबरोबरच नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये लागू आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हजार 783 एवढया लाभार्थीची नोंदणी झाली आहे.

Exit mobile version