Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातल्या पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्भया निधी तून १०० कोटी रुपये केले मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना पोलिसात तक्रार करायला सहाय्यकारी ठरतील, अशा महिला मदत केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहखात्याने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांमधे पोलिसांत तक्रार करण्याआधी महिलांना या केंद्राची मदत घेता येईल.

या मदतकेंद्रावर शक्यतो महिला अधिकारी नेमले जातील आणि त्यांना महिलांच्या विविध समस्यांविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रामधे वकिल, मानसोपचारतज्ञ आणि पुनर्वसन यासंबधीतले तज्ञ आणि गैरसरकारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील.

Exit mobile version